नांदेड अंगणवाडी भरती 2023
Nanded Anganwadi Bharti 2023 :- The recruitment process for 61 posts of Anganwadi Helpers has been started in Nanded District as per the instructions of the Chief Executive Officer, Deputy Chief Executive Officer of the Administrator Child Development Department of Hadgaon Taluka and with the cooperation of the Child Development Project control Supervisor. As per geverment directives. A public statement in this regard was given in front of the Gram Panchayat office on Monday, June 19. The application deadline is July 3, 2023.
नांदेड अंगणवाडी भरती 2023 :- हदगाव तालुक्यातील प्रशासक बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार व बालविकास प्रकल्प नियंत्रण पर्यवेक्षकांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यात अंगणवाडी मदतनिसांच्या ६१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सरकारी निर्देशांनुसार सोमवारी १९ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर यासंदर्भात जाहीर निवेदन देण्यात आले व त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३ आहे.
पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे, हदगाव तालुक्यातील ५२ महसुली गावातील आठ छोट्या अंगणवाडीसह ५२ गावातील ५३ मदतनिसांच्या एकूण ६१ पदांची भरती सुरु करण्यात अली असून, सोमवार १९ जून २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांच्या उपस्थितीत जाहीर घोषणा करण्यात आली. अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत १९ जून २०२३ ते ३ जुलै २०२३ या कालावधीत अर्ज करण्यात येणार असल्यामुळे यादी प्रकाशित करण्यात आलेल्या गावातील उमेदवाराने हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयात असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांच्या मार्फत करण्यात आले.
Organization | (ICDS) Integrated child Development Service |
Post | Anganwadi Supervisor, Helper, Worker. |
Section years | 2023-24 |
Vacancy | 61 (1166 Post) |
Website | https://womenchild.maharashtra.gov.in/ |
नांदेड जिल्यातील अंगणवाडी मध्ये ६१ जागांसाठी भरती निघाली आहे. दिलेल्या माहितीनुसार अर्ज मागविण्याची तारीख १९ जून पासून ३ जुलै २०२३ पर्यंत आहे. अंगणवाडी भरती साठी उमेदवार महिलेची किमान पात्रता हि 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कमाल पात्रतेच्या ठिकाणी पदवीधर पदवीपर्यंतच्या उमदेवार महिला अर्ज करू शकतात. पुढील माहितीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
नांदेड अंगणवाडी भरती पात्रता
पदाचे नाव | |
Supervisor – अंगणवाडी पर्यवेक्षक | Degree |
Worker – अंगणवाडी सेविका | 10th /12th pass (१० वी /१२ वी पास) |
Helper – अंगणवाडी मदतनीस | 8th pass (८ वी पास) |
Mini worker – मिनी अंगणवाडी सेविका | 8th pass (८ वी पास) |
वयोमर्यादा
नांदेड अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार महिलांनी किमान पात्रता ८ वी उत्तीर्ण असणे आणि कलाम पदवीधर असणे आवश्यक आहे. नांदेड अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करणात्या उमेदवार महिला व मुलींचे वय किमान १८ वर्ष आणि कमाल ३५ वर्ष असणे आवश्यक आहे. वय ४० वर्षापर्यंतच्या विधवा किंवा अपंग महिला देखील अर्ज करू शकतात.
नांदेड भरती संबधीत लागणारी कागदपत्र
- शैक्षणिक पात्रता संबंधित प्रमाणपत्र
- 8वी/10वी/12वी मार्कशीट
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
अंगणवाडी बद्दल थोडक्यात माहिती
अंगणवाडी हा भारत सरकारचा एक सरकारी कार्यक्रम आहे. भारत सरकारने हा कार्यक्रम १९७५ मध्ये मुलांचे आणि मातांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सुरु केला गेला होता. जो ६ वर्षाखालील मुलांना, गरोदर आणि बाळंत महिलांना बालपण, काळजी आणि शिक्षण प्रदान करते. अंगणवाडी केंद्र हि शहरी तसेच ग्रामीण भागात आहेत आणि त्या अंगणवाडी सेविका चालवितात, त्यांना भारत सरकारद्वारे मुले आणि मातांना विविध सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. अंगणवाडी मध्ये येणाऱ्या मुलांना पूरक पोषण,प्री-स्कूल अनौपचारिक शिक्षण,पोषण आणि आरोग्य शिक्षण,लसीकरण,आरोग्य तपासणी,रेफरल सेवा, या सेवांव्यतिरिक्त, अंगणवाडी केंद्रे सामाजिक एकत्रीकरणातही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मुलांचे आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यासारख्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते समुदायांसोबत काम करतात. ते कुटुंबांना सरकारशी जोडण्यास मदत करतात. अंगणवाडी या कार्यक्रमामुळे भारत सरकारला देशातून कुपोषण या आजारावर मात देण्यात यश देखील आले आहे.