(IB) Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023
(IB) Recruitment 2023 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023“Unleash Your Potential with Intelligence Bureau (IB)Recruitment 2023. Join the Elite Forces Safe guarding National Security” (IB) Intelligence Bureau केंद्रीय गुप्तचर हि भारताची प्रमुख गुप्तचर संस्था आहे, जी राष्ट्रीय सुरक्षा आणि काउंटर इंटेलिजन्स संबधीत माहिती गोळा करते. देशाला अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून सुरक्षित आणि सावधान ठेवण्यात केंद्रीय गुप्तचर ( IB इंटेलिजन्स ब्युरो ) विभागाची अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. केंद्रीय गुप्तचर (इंटेलिजन्स ब्युरो ) बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि क्षमता असलेल्या प्रतिभावान उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती मोहीम चालू केली आहे. केंद्रीय गुप्तचर (इंटेलिजन्स ब्युरो IB) विभागात ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech) या पदां अंतर्गत ७९७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पुढील सर्व माहिती बघण्यासाठी व अर्ज करण्यासाठी खाली स्क्रोल डाऊन करा.
The Central Intelligence Agency (Intelligence Bureau IB) is India’s premier intelligence agency, which collects information related to national security and counter intelligence. The Intelligence Bureau (IB) plays a very important role in keeping the country safe and alert from inernal and external threats. The Central Intelligence Agency (Intelligence Bureau IB) has launched a recruitment drive to select talented candidates with the required skills and abilities to work in the field of intelligence. 797 vacancies are to be filled under the posts of Junior Intelligence Officer Grade- II/Technical (JIO-II/TECH) In Central Intelligence (IB) Department. |
केंद्रीय गुप्तचर विभागाने (IB) भरतीबद्दल अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. गुप्तचर विभाग Intelligence Bureau मध्ये निघालेल्या ७९७ पदांची पूर्तता करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे विभागाने अपडेट केले आहे. इंटेलिजन्सस ब्युरो IB मध्ये ७९७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. फॉर्म भरण्या करीता उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, IT, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर इंजिनीअरिंग, कॉम्पुटर एप्लिकेशन इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc ( इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर सायन्स/फिजिक्स/गणित ) किंवा कॉम्पुटर एप्लिकेशन पदवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२३ हि आहे. पुढील माहितीसाठी आणि महत्वाच्या नोकरी अपडेट मिळविण्यासाठी हक्काची नोकरी या वेबसाईट ला भेट देत राहा.
(IB) Intelligence Bureau Recruitment 2023 Criteria
पदाचे नाव :- | ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech) |
शैक्षणिक पात्रता :- | इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी. |
पद संख्या :- | 797 |
अर्ज शुल्क :- | General/OBC/EWS: ₹500/-
(SC/ST/ExSM/महिला: ₹450/-) |
नोकरी ठिकाण :- | संपूर्ण भारत देश. |
वयोमर्यादा :- | 18 ते 27 वर्षे. २३ जून २०२३ 11:59 PM पर्यंत अर्जदार वय १८ पेक्षा कमी आणि २७ पेक्षा जास्त नसावे.
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट) |
परीक्षा :- | पुढे अपडेट केले जाईल. |
अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख :- | ३ जून ते २३ जून २०२३ (11:59 PM) पर्यंत |
अर्ज पद्धत :- | Online |
अर्ज भरण्याची अधिकृत साईट :- | https://www.mha.gov.in/en |
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर विभाग म्हणजेच (IB) Intelligences Bureau 2023 मध्ये ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech) साठी ७९७ जागांसाठी भरती निघाली आहे त्या मध्ये अर्जप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहे. दिलेल्या माहितीनुसार अर्ज मागविण्याची तारीख ३ जून २०२३ पासून २३ जून २०२३ दुपारी ११:५९ पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठीचे वय वर्षे १८ ते २७ पर्यंत आहे, या वयामध्ये बसणाऱ्या आणि नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करावे.
GENERAL :- | 325 |
OBC :- | 215 |
EWS :- | 79 |
SC :- | 119 |
ST :- | 59 |
परीक्षा पॅटर्न
(IB) Intelligence Bureau मध्ये भरतीसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर मुलाखत होऊन कागदपत्र तपासणी होणार. होणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये संख्यात्मक क्षमता, सामान्य जागरूकता, तर्कशक्ती आणि इंग्रजी भाषेशी संबंधित असणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांचा समावेश असतो. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना / अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
प्रथम अर्जदारांना Online लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि स्किल्स टेस्ट द्यावी लागेल. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना इंटरव्यू साठी बोलविण्यात येतील.
Brief information about Intelligence Bureau Agency
केंद्रीय गुप्तचर संस्थे बद्दल थोडक्यात माहिती
(IB) इंटेलिजन्स ब्युरो हि भारताची अंतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी गुप्तचर संस्था आहे. सेंट्रल स्पेशल ब्रँच म्हणून १८८७ मध्ये स्थापन झालेल्या या प्रख्यात संस्थेने जगभरात आपल्या प्रकारची सर्वात प्राचीन संस्था असल्याचा गौरव केला आहे. दहशदवाद, बंडखोरी आणि विध्वंस या सह अंतर्गत सुरक्षा धोक्यांवर गुप्तचर माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे याची जबाबदारी IB या संस्थेवर आहे. इंटेलिजन्स ब्युरो दहशदवाद विरोधी आणि VVIP लोकांच्या सुरक्षेतही महत्वाची भूमिका बजावते. इंटेलिजन्स ब्युरो हि अत्यंत गुप्त संस्था आहे आणि तिचे कार्य गुप्ततेने झाकलेले आहे. तथापि, संपूर्ण भारतामध्ये माहिती देणारे आणि एजटांचे एक विशाल नेटवर्क असल्याचे ज्ञात आहे. इंटेलिजन्स ब्युरो चा भारतीय पोलीस सेवेशी (IPS) जवळचा संबंध आहे आणि त्याचे अधिकारी अनेकदा गुण्यांचा तपस करण्यासाठी आणि दहशदवादी हल्ले रोखण्यासाठी पोलिसांशी जुळवून काम करतात. भारतातील अनेक दहशदवादी हल्ले रोखण्यात महत्वाची भूमिका बजावण्याचे श्रेय IB या विभागाला जाते. अलीकडच्या वर्षात, इंटेलिजन्स ब्युरो उच्च – प्रोफाइल आणि भ्रष्टाचार प्रकरणांच्या तपासात सामील आहे.
IB हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेचा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचे कार्य देशाच्या सुरक्षेतेसाठी आवश्यक आहे.
इंटेलिजन्स ब्युरो च्या काही प्रमुख जबाबदाऱ्या आपण जाणून घेऊयात.
- दहशदवाद, बंडखोरी आणि विध्वंस यासह देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यांवर माहिती गोळा करणे.
- माहितीचे विश्लेषण करणे आणि ते धोरणकर्ते आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना प्रदान करणे.
- दहशदवादविरोधी आणि VIP व VVIP लोकांची सुरक्षा.
- संपूर्ण भारतभर माहिती देणारे आणि एजंट्सचे विशाल नेटवर्क बनविणे व राखणे.
- गुन्ह्याचा तपस आणि दहशदवादी हल्ले रोखण्यासाठी भारतीय पोलीस यंत्रानेसह (IPS) जुळवून काम करणे.
- हाय प्रोफाइल भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करणे.